
पंचनामा पांढऱ्या कपड्याचा
पंचनामा पांढऱ्या कपड्याचा
मित्रांनो,….
गेल्या सत्तावीस वर्षांपासून आम्ही वर्धेच्या पत्रकारितेच्या रणांगणात आहोत. आमचं पान नेहमी उघडं—खुलं किताब!
कित्येक वादळं पाहिली, कित्येक धक्के सहन केले, अनेकांनी दाबण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही कधीही तोंड बंद ठेवलं नाही.
मात्र सत्ता बदलली आणि दबावाचं चक्र फिरू लागलं.
“जो बोलेल—तो चिरडला जाईल” अशी भीषण पद्धत सुरू झाली. आणि आम्हीसुद्धा या खेळाचे बकरे ठरलो. आठ दिवसांत आठ खटले आमच्यावर दाखल झाले.
आम्ही वाड्यात गेलो, जखमा झाल्या, हाडं मोडली—पण तुटलो नाही. परत आलो, उभे राहिलो.
आज आम्ही ठरवलं आहे.
जे पोलिस अधिकारी खोट्या केसेस लावतात, जे पांढरे कपडे घालून काळी कृत्यं करतात, जे लफडे लपवतात आणि लोकांसमोर सज्जनतेचा आव आणतात—त्यांची दुर्गंधी उघड करायचीच.नक्की वाचा,येणाऱ्या पंचनामाच्या अंकात..
हे सदर म्हणजे आमचं उत्तर, आमची शपथ, आणि वर्ध्यातील पांढऱ्या कपड्यांचा खरा पंचनामा