
प्रोटोकॉल काय असतो ? खासदारांनी अधिकाऱ्याला झापले
प्रोटोकॉलच्या वादावर खासदारांनी अधिकाऱ्याला झापले
वर्धा (मंगेश चोरे)
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हिंगणघाट नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात प्रोटोकॉल वादावरून रंगलेल्या घडामोडींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला खासदार तथा आमदार मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची पत्रिका तयार करताना प्रोटोकॉलनुसार खासदारांचा दर्जा हा आमदारांपेक्षा वरिष्ठ असतानाही पत्रिकेत त्यांचे नाव योग्य पद्धतीने नोंदवले गेले नाही. यावरून खासदार श्री.अमर काळे यांनी भर सभेतच अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.
खासदार काळे यांनी थेट अधिकाऱ्याला प्रश्न विचारत, “आपण प्रोटोकॉलचा भंग का केला?” असा जाब विचारला. अचानक झालेल्या या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी मात्र शांत राहणेच पसंत केले.