ग्रामीण भागातून पंकज भोयर यांचे भवितव्य धोक्यात शासकीय महाविद्यालय गेले आमदारांनी काय केले? जनतेचा सवाल?

ग्रामीण भागातून पंकज भोयर यांचे भवितव्य धोक्यात शासकीय महाविद्यालय गेले आमदारांनी काय केले? जनतेचा सवाल?

हेच ते आमदार महोदय,निवडणूक आली की मते मागायला येऊ निवडून आले की कमिशन खाऊ,

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी) मतदान अत्यंत जवळ येतात जनतेचा कौल दिसू लागला आहे. मागील दहा वर्षापासून आमदारअसलेल्या पंकज भोयर यांनी वर्धा शहराला लाभलेले वैद्यकीय महाविद्यालय शहराबाहेर जाऊ दिले. यामुळे गरीब ग्रामीण जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. गोरगरीब जनतेच्या हिताचे शासकीय महाविद्यालय हे वर्धा येथे होणार होते. भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याचे वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या सरकारी महाविद्यालयाला अलगद घालवण्याचे काम आमदार यांनी केल्याने ग्रामीण भागातील जनता अत्यंत नाराजी व्यक्त करत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा या ठिकाणी झाले असते तर अत्यंत अल्प दरात उपचाराची सोय झाली असती. परंतु जिल्ह्याच्या ठिकाणावरून हे वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट ला रवाना करण्यास वर्धेचे आमदार हे सर्वस्वी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अनेक विषयाला धरून ग्रामीण भागातील जनता नाराजी वेक्त करत आहे. बोर अभयारण्याच्या बाजूला असलेले गावे पुनर्वसित करणे अत्यंत गरजेचे असताना त्या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारचे लक्ष वेधले गेले नाही. जंगली जनावरांनी कित्येक माणसांची शिकार केली मात्र यावर कसलेही प्रकारचे लक्ष वेधले गेले नाही.
अशा अनेक मुद्दे असून यामुळे ग्रामीण भागातील जनता अत्यंत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करताना दिसते. यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार पंकज भोयर यावेळी आपटी खाणार असे संकेत आहे. तर खरी लढत ही डॉक्टर सचिन पावडे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles