
माजी खासदार आणि आमदारांनी केला वर्धा जिल्ह्याचा बट्ट्याबोळ जनतेचा सूर …पंकज भोयर यांच्यावर प्रचंड नाराजी
वर्धा (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने अद्याप उमेदवारी न दिल्याने समीकरण स्पष्ट झाले नाही .परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावान असलेले शेखर बाबू शेंडे यांच्या उमेदवारीला यावेळी धक्का देण्याकरिता अनेक हौसे गवसे पुढ आले आहे .परंतु शेखर शेंडे यांची उमेदवारी यावेळी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून शेखर शेंडे यांचा विजय निश्चित असल्याचे चर्चेत आहे .आमदार पंकज भोयर यांच्यावर असलेली प्रचंड नाराजी ग्रामीण भागातील विकास कामे न झाल्याने ग्रामीण भागातील नाराजी शहरातील रामनगर परिसरातील लीज प्रकरण या सर्वांनी वर डोके काढले आहे .यावेळी भारतीय जनता पार्टीला अपयश स्वीकारावे लागणार .असे सर्वत्र चर्चेत आहेत . मुख्य म्हणजे पक्षांतर्गत पंकज भोयर यांच्या विरोधात असलेली नाराजी उफाळून आली आहे. या सर्वांनी सुद्धा लक्ष शेखर शेंडे यांच्याकडे वळवले आहे. यामुळे शेखर शेंडे यांचा विजय निश्चित असल्याचे सर्वसामान्यांच्या तोंडातून कळते .महत्त्वाची असलेली वर्धा बाजारपेठ सुद्धा पंकज भोयर यांच्या विरोधात सूर काढत असून शेखर शेंडे यांच्यावर प्रचंड असा विश्वास व्यापारी वर्गाने दर्शवला आहे. हल्लीच्या काळात नुकताच भारतीय जनता पार्टीतून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेले अभुदय मेघे यांनी उमेदवारीवर दावा केला असून यामुळे शेखर शेंडे यांना अडचण निर्माण झाली आहे .परंतु उदय मेघे यांचे कसलेहीअस्तित्व नसून आजवर काकांचे बोट धरून चालणारे उदय मेघे प्रचंड बहुमताने पराभूत होणार. आणि याचा सरळ फायदा भारतीय जनता पार्टीला होणार. त्यामुळे काँग्रेस नवख्या उमेदवाराचा विचार करेल काय? हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. वर्धेतील अनेकांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटेवर दावा केला असून शहरातील बालरोग तज्ञ डॉक्टर पावडे यांनी सुद्धा उमेदवारी मिळण्याचा अर्ज केला आहे वास्तविक डॉक्टर पावडे हे राजकीय व्यक्ती नसून राजकारण हा विषय यांच्यापासून बऱ्याच लांब आहे .त्यामुळे हल्ली सर्वाधिक मोठी मत बँक ही शेखर शेंडे कडे असून शेखर शेंडे या वेळी भारतीय जनता पार्टीला मुकाबला देणारा उमेदवार ठरणार असे .सुद्धा चर्चेत आहे. पंकज भाऊ यांच्या वरती असलेली जनतेची नाराजी. जनता स्पष्ट स्वरूपात व्यक्त करू लागल्याने पंकज भाऊ यांना ही निवडणूक अत्यंत जड जाणार आहे. मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात पंकज भोयर यांनी कोणतेही मोठे असे विकास कामे केली नाही. गेले अनेक वर्षापासून वर्धा शहरातील मुख्य असा बजाज चौकातील महत्त्वाचा पूल भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि आमदार असताना झाला नाही. याउलट भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदारांनी भाजपचेच नगर परिषदेचे अध्यक्ष असताना शहरातील सर्व रस्ते खोदून त्यात टाकलेल्या अमृत योजनेचा मलिदा खाणाऱ्यांनी मलिदा तर खाल्ला मात्र योजनेचा तमाम बट्ट्याबोळ केल्याने वर्धेतील शेकडो लोकांचे हात पाय तुटले .हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे .महात्मा गांधींच्या जिल्ह्याचा भकास वाडा करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे खासदार तथा आमदार सर्वस्वी जबाबदार असल्याने मागील काळात माजी खासदार रामदास तडस यांचा प्रचंड बहुमताने पराभव झाला आपकी बार आमदार की बारी .असे जनतेत नारे लागत आहे .त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमदार पंकज भाऊ यांना ही निवडणूक जड जाणार आहे. विविध प्रयोग करून पंकज भाऊ यांनी अनेक उमेदवार मते खाण्याच्या दृष्टीने उभे करण्याचा नवखा प्रयोग सुरू केला. यापूर्वी दोन्ही निवडणुका अत्यंत अल्पमताने निवडून आलेल्या पंकज भाऊ यांना यावेळी पराभवाचा फटका बसणार असे स्पष्ट चित्र आहे क्रमशः