सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थिनीला नवीन जीवनमार्ग 🌸

सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थिनीला नवीन जीवनमार्ग 🌸

वर्धा (प्रतिनिधी)
मु. शिवनगर वर्धा येथील संबोधी शंकर गोडघाटे हिने JEE परीक्षेत यश मिळवत कर्नाटक, धारवाड येथील आयआयआयटी महाविद्यालयात बी.टेक प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २३ ऑगस्ट असून, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती तिच्या मार्गात अडसर ठरत होती.

ही बाब समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू थूल यांना समजल्यावर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेश वैद्य यांच्यासह संबोधीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शिक्षणाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक मदतीची गरज ओळखून, राजू थूल यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून समाजातील दानशूर नागरिकांना मदतीचे आवाहन केले.

अवघ्या तीन दिवसांत ₹५७,००३ इतकी रक्कम जमा झाली आणि संबोधीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार करून गोळा झालेला निधी तिला प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश वैद्य, सुनील ढाले, गौतम पाटील, सुभाष गायकवाड, के. बी. थूल, महेंद्र बनसोड तसेच तिच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles