
अपक्ष उमेदवारी कुणाला भोवणार ? की अपक्ष बाजी मरणार ?
वर्धा ( मंगेश चौरे) वर्धा मतदार संघात भारतीय जनता पार्टी ,काँग्रेस यांच्यात खरी लढत असणार आहे .असे चित्र असताना. रिंगणात असलेल्या एका उमेदवाराचा अपक्षातील उमेदवारामुळे पराभव निश्चित होणार असे चित्र आहे.
शहरातील नामवंत बालरोग तज्ञ उच्चशिक्षित सुज्ञ असे अपक्षात रिंगणात असलेले डॉक्टर सचिन पावडे हे कुणबी समाजाचे असल्याने तसेच त्यांची लौकिकता असल्याने समाजाचे तसेच इतर समाजाचा कौल त्यांच्याकडे दिसून येतो. अत्यंत पारदर्शक प्रचार यंत्रणा सुज्ञ प्रचारक सोबतीला असल्याने पावडे यांचे पारडे जड होत चालले आहे. याचा फटका भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री.पंकज भोयर यांना बसण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे मागासवर्गीय समाजातील अपक्ष निवडणूक लढवत असलेले वर्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री विलास कांबळे यांचा सर्व जाती समावेशक जनसंपर्क असल्याने कांबळे हे सुद्धा महत्त्वाचा धक्का देण्यास कारण ठरणार आहे. दोन्ही उमेदवार हे दोन्ही महत्त्वाच्या पक्षातील मतदारांना विभाजित करू शकेल इतकी मोठी पात्रता दोन्ही उमेदवारा जवळ असल्याने महत्त्वाच्या पक्षातील उमेदवाराला पराजय पत्करावा लागेल की अपक्ष बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.