
लोक न जमल्यामुळे अमित शाह यांची सभा रद्द
लोक न जमल्यामुळे अमित शहा यांची सभा रद्द
वर्धा (जिल्हा प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची जाहीर सभा आयोजित केली होती वेळेपर्यंत लोकांची गर्दी न जमल्याने आज भारतीय जनता पार्टीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून आहे रोजंदारीत प्रत्येक वेळी लोकांचा समूह जमवून सभेला भव्य स्वरूप देणारे भारतीय जनता पार्टी यावेळी तोंडावर पडली आहे. हल्ली शेतात कापूस वेचण्याचा हंगाम असल्याने महिला तसेच मुलं शेतात कापूस वेचुन प्रति दिवस 1000 रुपयाच्या वर कमाई करतात दुसरीकडे भारतीय जनता पार्टी 600 रुपये रोजाने सभेकरिता लोकांना आणत असल्याने लोकांनी यावेळेस सभेत येणे टाळले आहे सर्व गाड्या खाली असल्याने अमित शाहा यांची सभा होऊ शकणार नाही आणि सदरची सभा व्यवस्थित पार न पडल्यास मोठी बदनामी होईल या भीतीने भारतीय जनता पार्टीने अमित शहा यांची सभा रद्द केल्याची सूत्राची माहिती आहे
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकज भोयर हे यावेळी निवडणूक जिंकणार नाही याची शक्यता सर्वत्र पक्षात असल्याने पंकज भोयर यांच्यावरील विशेष लक्ष काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे पंकज भोयार यांनी सुद्धा आपली पोळी भाजली जाणार नाही याची पूर्ण जाणीव असल्याने सर्व कार्यक्रमाला आतपटे घेतल्याचे दिसून येते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेखर शेंडे तसेच अपक्षातील डॉक्टर सचिन पावडे यांच्यात खरी लढत होणार असून पंकज भोयर हे तिसऱ्या क्रमांकावर जाणार अशी सर्वत्र चर्चा आहे .विशेष म्हणजे यावेळी जनतेने मागील सभेची आठवण करून दिली माननीय नरेंद्र मोदी यांच्या सवेकरिता गावागावातून ग्रामस्थांना रोजाने आणले होते त्यावेळी त्यांना जेवण सुद्धा मिळाले नाही उपाशा पोटी जनतेला घरी जावे लागले या विषयाची जाणीव ठेवत कुणीच भाजपच्या सभेला आले नाही सूत्रांची माहिती.