
पडण्याच्या भीतीने भाजप उमेदवाराकडून पैशाचा वाटप भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता सूत्राची माहिती
पडण्याच्या भीतीने भाजप उमेदवाराकडून पैशाचा वाटप भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता सूत्राची माहिती
वर्धा (प्रतिनिधी)वर्धा निवडणुकीचा प्रचार थंडावला असताना उमेदवाराला आपल्या विजयाची भीती वाटत असल्याने भाजपचे उमेदवार डॉ.पंकज भोयर यांच्याकडून रामनगर परिसरात पैसे वाटप करीत असताना दिसून आले
विकास शून्य असलेले डॉ. पंकज भोयर यांनी रामनगर परिसरामधील लीज प्रकरणात नगरवासीयांची दिशाभूल केली त्यामुळे तीस हजार मते असलेला शहराचा मुख्य भाग रामनगर आपल्याला मतदान करणार नाही या भीतीने पंकज भोयर यांनी पैशाचा वाटप केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे यांच्या जाहीरनाम्यात पाच पाचशे रुपयांच्या नोटा टाकून घरोघरी वाटप केल्याप्रकरणी प्रत्यक्ष व्हिडिओ काढण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकज भोयर यांच्यावर असलेली प्रचंड नाराजी आता स्पष्ट दिसू लागली असून अपक्ष उमेदवार डॉक्टर सचिन पावडे आणि काँग्रेसचे उमेदवार शेखर भाऊ शेंडे यांच्या सरळ लढत होण्याची चर्चा असल्याने आपला टिकाव लागणार नाही या भीतीने डॉक्टर पंकज भाऊ यांनी पैशाचा वाटप केला अशी सूत्राची माहिती आहे. वीस कोटी रुपये खर्च करून निवडणूक लढवत असलेले डॉक्टर पंकज भोयर आज रात्री ठीक ठिकाणी पैसे वाटणार असल्याची सूत्राची माहिती आहे.