
सावधान गाडी चोरांपासून सावधान.नागपूरच्या सागर नामक सरदार याचा पडदा फाश..
सावधान गाडी चोरांपासून सावधान.नागपूरच्या सागर. नामक सरदार याचा पडदा फाश..
वर्धा(प्रतिनिधी) नागपूर येथील टेका नाका परिसरात दुसऱ्याचे दुकान आपले असल्याचे सांगून वाहन विकत घेणाऱ्या काही सरदार याची पोलिसात तक्रारी नंतर अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
नागपूर टेका नाका परिसरातील एक दुकान आपले असल्याचे सांगून मागील एक वर्षाआधी फॉर्च्यूनर कार किंमत पंचावन्न लाखाचे वाहन विकत घेण्याचा सौदा करण्यात आला.वाहनावर आलेले कर्ज फेडून मूळ मालकाला पाच लाख रुपये देण्याचे बोलून तीन लाख रुपयाचा चेक देण्यात आला.वरील तीन लक्ष रुपये आणि.चेक चे दोन लक्ष रुपये.देण्याआधी बँकेचे कर्ज देण्याचे ठरले.परंतु एक वर्ष होऊन काहीही पैसे न देता सरदार सागर हा कोणताही प्रतिसाद देत नसल्याने अखेर हा मामला पोलिसात.आणि न्यायालयात गेल्यानंतर अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.वर्धा अमरावती सहित अनेक ठिकाणाहून ट्रक आणि अनेक प्रकारचे वाहन चोरी गेलेले वाहने याच टोळीने चोरी केले असा प्राथमिक अंदाज आहे.लवकरच हा विषय पुढे येणार असून मामला पोलिसात जाणार असे संकेत.दिसून येत असून यांनी दिलेला चेक सुद्धा बोगस आल्याचे दिसून येते. बँक कर्जात असलेल्या वाहनांचा नंबर आणि चेचीस नंबर बदलून वाहन परस्पर विकण्याचे सुद्धा प्रकार या टोळी कडून केले जात असल्याची विश्वसनीय माहिती असून.वाहनांना चायना वाहन म्हणून विकण्याचा प्रकार सुद्धा केला जात असल्याची विश्वसनीय खबर आहे.हा सर्व प्रकार लवकरच उघड होणार असून या टोळीत अनेक सरदार मंडळीचा समावेश आहे.असे समजते.