आता भ्रष्ट पोलिसांनी कोर्टात यावे ~ मंगेश चोरे

आता भ्रष्ट पोलिसांनी कोर्टात यावे ~ मंगेश चोरे
वर्धा(प्रतिनिधी) मागील काळात पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला.होता एकच बातमी अशी झोंबली.की हातधून पोलिस विभागाने आमच्या पार्श्वभागाला फटाके बांधले. बारा दिवस बिन भाड्याच्या खोलीत आम्ही राहिलो.फरक काय पडला ? काहीच नाही. आमची नौकरी गेली,नाही आम्ही उपाशी मेलो नाही.परंतु आता अनेकांची नौकरी धोक्यात येणार.आपल्या बापाचा कायदा समजून पदाचा गैरफायद्या घेऊन गुन्हे दाखल करणे.जेवढे सोपे असले तरी.सिद्ध करणे इतके सोपे नाही.आणि आता अनेक तत्कालीन पोलिस अधिकारी यांना उच्च न्यायालयात उभे होण्याची वेळ आली आहे.
पोलिस हे मनमर्जी गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करतात.मुळात गुन्हेगार असल्याने ते पोलिसांनी जे केले ते सहनही करतात.परंतु आपला आकस काढण्या करिता जर.आमच्या सारख्या पत्रकारावर बनावट तक्रारदार पकडून गुन्हे दाखल केले जात असतील तर यांचे कपडे न्यायालयात उतरविण्या शिवाय पर्याय नाही.
मागील काळात वर्धा पोलिस ठाणे,सावंगी पोलिस ठाणे,रामनगर पोलिस ठाणे,सेलू पोलिस ठाणे इत्यादी ठिकाणी मनात येईल तसे गुन्हे दाखल केले.आम्ही बिनभाड्याच्या खोलीतही गेलो.बारा दिवस.तेराव्या दिवशी आलो आणि पहिले यांची तेरावी काशी करावी या कामात लागलो.एक एका अधिकाऱ्यांच्या गावा गावात जाऊन यांची.आपल्या गावात किती इज्जत आहे बघितली. कोणी किती संपत्ती जमवली आणि कोणी कुठे काय घेऊन ठेवले याचा पूर्ण गोषवारा काढला हारामाचा माल कमावण्या या चोर सरकारी नोकरांनी.कुठे शेती कुठे मकान.कुठे दुकान,कुठे कोटीचा दवाखाना. याचा पुरा हिशोबच काढला
आणि आता हाती आले पुरावे.प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यापूर्वी आम्ही वकिलाना भरपूर पैसे दिले.आता आपली वकिलीआपणच करायची आणि याची पोल खोलायचीचा असा निर्धार करून.न्यायालया समोर हजार झालो. उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपुर येथे मेहेरबान न्यायाधीश साहेबाना स्वतः बाजू मांडण्याची परवानगी मागितली.
आता वर्धा पोलिसांनी कसा आपल्या बापाचा कायद्या समजून पदाचा गैरफायदा घेतला,हे पुढे येणार.खोटे गुन्हे दाखल करायला अक्कल पाहिजे.आणि अक्कल शून्य अधिकारी,धनाजी जलक याने तर.आपल्या पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात दाखल प्रकरणात.जे केले त्यात यांचे कपडे तर सोडा अंतर्वस्त्र निघण्याची वेळ येणार आहे.पोलिस हे जनतेचे सेवक आहे.जनतेच्या रक्षणार्थ त्यांना आपण पगार देतो.यांना भ्रष्टाचार करण्याचा अधिकार नाही.आणि तरीही यातील काही शेण खातात.यावर आवाज केला तर हे पदाचा गैरफायदा घेतात.आणि कसा गैरफायदा घेऊन.चुकीच्या कारवाया करतात हेच आता उघड होणार.इतकेच नव्हे तर या यातील काही अधिकाऱ्यांनी चक्क न्यायालयाचीही दिशाभूल केली.न्यायालयात खोटी माहिती सादर केली.विचार करा किती निगरगट्टा झालेत हे.एकाने मानवाधिकार आयोगाच्या कोर्टामध्ये फिर्यादी महिलेची फोटोग्राफी केली.महिलेने चांगलाच तांडव केला.आणि तो अधिकारी कोर्टात हजर होण्याऐवजी उठून पळाला. असे अनेक प्रकार मागील काळात वर्धा पोलिसात झाले. परंतु यात निवडक अधिकाऱ्यांनीच उतमाज केला .आणि आता हे सविस्तर प्रकरणच न्यायालयात गेल्याने.यांची वाट लागणार..आणि वाट लागल्या शिवाय आम्हीही दम घेणार नाही.

वाचत रहा…


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles