
आजपासून बालनाट्य कार्यशाळेची धमाल
आजपासून बालनाट्य कार्यशाळेची धमाल
व्यक्तिमत्त्व विकासावरही भर, मुलांमधील सृजनशिलतेच्या झ-यांचा शोध
वर्धा. शेकडो मुला-मुलींना स्वच्छंदपणे जगण्याचे आकाश खुले करून देणा-या, अभिनयासह विविध कला-क्षेत्रांत दमदार पाऊल ठेवण्याचा आत्मविश्वास मिळून देणा-या चिल्ड्रन्स थिएटर अकादमी अर्थात CTA च्या बालनाट्य व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेला सोमवार, 5 मेपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी, दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (NSD) सहकार्याने सलग 14 वर्षे या राष्ट्रीयस्तरीय सृजनशील कार्यशाळेचे वर्ध्यात आयोजन करण्यात आले होते.
बालकांनी बालमनाचा वेध घेत स्वव्यक्तिमत्वातील सृजनशिलतेच्या झ-यांचा शोध घ्यावा, या हेतूने चिल्ड्रन्स थिएटर अकादमीने 2003 ला ‘क्रिएटीव्ह ड्रामा अॅण्ड पर्सनालिटी डेव्हलपमेंट वर्कशॅाप’ हा उपक्रम सुरू केला. दिल्लीस्थित राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला. 14 वर्षांच्या कार्यशाळा आयोजनांत शेकडो मुले-मुली घडलीत. काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रवेशाकरिता 7841013382 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संहिता इथापे यांनी केले आहे. मुला-मुलींची जडणघडण करणा-या या कार्यशाळेत पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या बालकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक हरिष इथापे, प्रसिद्ध कवी संजय इंगळे तिगावकर, सामाजिक कार्यकर्ते पंकज वंजारे यांनी केले आहे.
0000000000000000000
निसर्गरम्य परिसरात फुलणार कार्यशाळा
चिल्ड्रन्स थिएटर अकादमीतर्फे 5 ते 15 मे या कालावधीत 11 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. फुला-झाडांनी आच्छादलेल्या, निरव शांतता लाभलेल्या रामनगरस्थित राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या विस्तिर्ण परिसरात सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळात ही कार्यकाळा होणार आहे. या कार्यशाळेत वय वर्षे 10 ते 17 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे.
000000000000000000000