
आमदार केचे यांच्या सह दोन लोकांनी जीवे मारण्याच्या पर्यंत केल्याची पोलिसात तक्रार
आमदार केचे यांच्या सह दोन लोकांनी जीवे मारण्याच्या पर्यंत केल्याची पोलिसात तक्रार.
केचे यांनी जीवे मारण्याची फोनवरून दिली होती धमकी.
वर्धा(मंगेश चोरे) आर्वी येथिल विधान परिषदेचे आमदार श्री.दादारावजी केचे यांनी काही साथीदाराच्या माध्यमातून आपल्याला जिवे मारण्याचा पर्यंत केला. असे स्पष्ट नमुद करून आर्वी येथिल फर्निचर व्यापारी होजेफा बोहरा यांनी आज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात आर्वी येथिल एका वर्तमान पत्राचे पत्रकार टेकचंद मोटवानी,आणि वकील असलेला त्यांचा भाऊ, यांचा समावेश आहे. या प्रकरणात सविस्तर असे की, काही दिवसापूर्वी आर्वी लगत देऊरवाडा गावाला लागून असलेल्या वर्धा नदीवर रेती घाट सुरू असुन तो घाट होजेफा बोहरा याचा असल्याचा आरोप करून, केचे यांनी या विषयाला चांगलेच रंगविले होते. वास्तविक या नदीचे पाणी पुढे असलेल्या प्रकल्पामुळे तुंबले असुन त्या ठिकाणी किमान पंचवीस फूट पाणी आहे. केचे यांना त्या ठिकाणी कोणतेही रेती काढण्याचे साहित्य अथवा खुद होजेफा बोहरा यानेच ती रेती काढली असा कोणताही पुरावा. मिळाला नसतांना केचे यांनी बोहरा याच्या मा. मुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रारी केल्या. उपोषणाच्या धमक्या दिल्या आणि याच्या अटकेची मागणीही केली. याचे कारण काय? वास्तविक होजेफा बोहरा हा अत्यंत कमी वयाचा तरुण असुन त्याचे आर्वी शहरात अनेक व्यवसाय आहेत. केचे यांना हा रेती काढताना कुठे दिसून आला नाही, किंवा याच्या कडे कोणतेही ट्रक अथवा टिप्पर असे काही साहित्य नाही. तरीही याला माफिया केले ? याचे कारण काय? यात काय राजकारण आहे. हेच समजायला मार्ग नाही. मागील आठ दिवसा आधी आमदार केचे यांनी बोहरा यांच्या वडीलांना फोन करून मुलाचे हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्या होत्या. ते संभाषण रेकॉर्ट आहे. तसेच या मोटवानी भावंडांनी बोहरा यांच्या विरोधात अनेक प्रकारचे मेसेज सोशल मिडिया वरून प्रसारित केले. यांनी सुद्धा बोहरा यांना मारण्याचा कट शिजविला. “एक से भले दो, दो से भले तिनं” असा प्रकार होऊन आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. असा स्पष्ट आरोप होजेफा बोहरा याने आपल्या तक्रारीत केला आहे.
दिनांक१४ मे च्या रात्री नऊ ते साडे नऊ च्या दरम्यान पुलगाव मार्गावरून एका हॉटेलातून जेवण करून घरी आपल्या एक्टिवा गाडीने येत असताना रस्त्यात मागवून भरधाव वेगाने एक लाल रंगाची गाडी येऊन डाव्या बाजूने जबरदस्त धडक दिली. त्या धडकेने पुढे चालत आलेल्या ट्रेलर वर गाडी आदळली. लाल गाडीच्या धडकेने होजेफा चालवित असलेल्या दुचाकीचा शेंदा मेंदा झाला. यामुळे होजेफा याचे दोन्ही हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला. वर्धा येथिल डॉक्टरांच्या इलाजंती हाताचे ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा दोन्ही हात निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. होजेफा बोहरा याने दिलेल्या तक्रारीत केचे यांनी दिलेल्या धमक्या आणि मोटवानी यांनी केलेला प्रकार नमूद असुन यावर पोलिस तपास करीत आहे. या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी होजेफा बोहरा आणि त्याच्या परिवाराने व समस्त बोहरा समाजाने केली आहे.