
आमदार केचे यांच्या पासुन आपल्याला आणि आपल्या परिवाराच्या जिवाला धोका.? बोहरा
*आमदार केचे यांच्या पासुन आपल्याला आणि आपल्या परिवाराच्या जिवाला धोका.? होजेफा बोहरा
*पोलिस स्टेशन चे सी. सी . टीव्ही फुटेज मोठा पुरावा
*बोहरा परिवार उपोषणाला बसणार.
वर्धा(मंगेश चोरे) आर्वी येथिल राहणारे फर्निचर व्यापारी होजेफा बोहरा यांना दिनांक १४ तारखेला रात्रीचे वेळी.लाल रंगाच्या गाडीने जाणिवपूर्वक धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.तत्पूर्वी आमदार केचे यांनी आपल्या वडिलांना फोन करून केचे यांनी.आपल्या मुलाचे हात पाय तोडील असे म्हणुन धमकावले होते.यामुळे केचे यांच्या सह अधिक दोन लोकांवर शंका असल्याचे नमुद करून आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ज्या दिवशी होजेफा बोहरा हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरिता गेला.त्या वेळी केचे यांनी.काही गुंड लोकांना लाठ्या काठ्या घेऊन आपल्याला मारण्या करिता पोलिस ठाण्यासमोर पाठविले होते.ही बाब येथिल ठाणेदार साहेबांनी लक्षात आणुन दिली.जर तक्रार देऊ नये म्हणुन .माननीय आमदार दादारावजी केचे यांनी.पोलिस ठाण्यात गुंड पाठविले यावरून यांनीच आपला जीव घेण्याचा प्रकार केला.असा स्पष्ट आरोप करून.पोलिसांनी प्रथम दोन तिन दिवस चौकशी करून.खरोखर आपल्या वडीलांना फोन करून धमकावले किंवा नाही.तसेच पोलिस ठाण्याच्या सी.सी.टीव्ही फुटेज मध्ये गुंड दिसतात की नाही .याची सखोल चौकशी आणि खात्री करून कारवाई करावी.माझा तत्काळ कारवाई करण्याचा आग्रह नसुन पुरावे घेऊन कारवाई करा.आपण कोणतेही खोटे.बोलत नाही असे स्पष्ट केले. असे आमच्या प्रीतीनिधि कडे व्यक्त केले आहे.या प्रकरणात चौकशी अंतीम टप्यात असुन लवकरच यात कारवाई केली जाईल. असे समजते.नाहक तयार झालेल्या या राजकारणाचे आता मोठे गचकरण झाले असुन.याला आता प्रचंड खाज निर्माण झाल्याने ही खाज .कोणत्या ठिकाणी थांबेल.हे व्यक्त करणे कठीण आहे …