

वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा येथील काही बिल्डरांनी Confederation of Real Estate Developers Association of India (CREDAI) या संघटनेशी संलग्न असल्याचे भासवत गेल्या चौदा वर्षांत प्रत्येकी ११,००० रुपये सभासद फी जमा केली. मात्र, याचे अधिकृत नोंदणी (रजिस्ट्रेशन) नसल्यामुळे ही रक्कम बेकायदेशीरपणे गोळा केल्याचा आरोप आहे.संघटनेत नेमण्यात आलेले अध्यक्ष आणि पदाधिकारी बोगस असल्याचेही उघड झाले आहे. अलीकडे संघटनेत अंतर्गत वाद निर्माण झाला असून काही सदस्यांनी वर्धा येथील बिल्डर आणि लेआऊट विक्रेत्यांच्या गैरव्यवहारांबाबत आवाज उठविला आहे. यात बेकायदेशीर जमीन खरेदी, बांधकामातील अनियमितता, बनावट स्वाक्षऱ्या यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे.या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, हे प्रकरण लवकरच पोलिसांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, राज्यस्तरीय शिष्टमंडळ वर्धा येथे येऊन ही परिस्थिती तपासणार आहे. आतापर्यंत जमा झालेल्या कोटी रुपयांच्या सभासद फीचा हिशोब सुद्धा मागवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.क्रमाश