

वर्धा (मंगेश चोरे): महामार्गावरील केळझर येथे खुलेआम सुरू असलेल्या डिझेल-पेट्रोलच्या अवैध धंद्याशी आमचा काहीही संबंध नाही. मी मंगेश चोरे, पत्रकार असून माझे आणि माझ्या कुटुंबाचे वास्तव्य वर्धा येथे आहे.काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायाशी माझा संबंध आहे, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे मी स्पष्टपणे जाहीर करतो की, केळझर येथे सुरू असलेल्या डिझेल-पेट्रोल अथवा चोरीच्या लोखंडाच्या अवैध व्यवसायांशी माझा कुठलाही संबंध नाही.येशील चोरे व माझ्यात कोणतेही नातेसंबंध नाहीत. माझ्या नावाचा गैरवापर केला जात असून पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू असेल किंवा नसेल, याची मला काहीही माहिती नाही.पुढील काळात या ठिकाणी कोणताही योग्य-अयोग्य प्रकार घडल्यास त्यास माझी कोणतीही जबाबदारी नसेल. तसेच, केळझर येथील चोरे कुटुंबाशी माझे कोणतेही नाते नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
– मंगेश चोरे (पत्रकार), वर्धा