कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शेगावकर – वाहतूक शाखेत जनतेत लोकप्रिय

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शेगावकर – वाहतूक शाखेत जनतेत लोकप्रिय


वर्धा (मंगेश चोरे) – पोलीस हे समाजाचे रक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र झटत असतात. समाजात शिस्त, सुरक्षितता आणि न्याय प्रस्थापित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्याचा निष्ठेने निभाव करतात. त्यांची ही निस्वार्थ सेवा तुकाराम महाराजांच्या ओवीशी अत्यंत सुसंगत आहे:
“जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले 
तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||”
या ओवीचा अर्थ असा की जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, त्यांना आपले मानतो, तोच खरा साधू आहे आणि जिथे अशी सेवा आहे, तिथेच देव आहे. हेच गुण एखाद्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यामध्ये दिसून येतात. संकटात असलेल्या नागरिकांना मदत करणे, अन्यायाविरुद्ध लढणे आणि समाजात शांतता टिकवणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य असते.
वर्धा येथील सावंगी पोलीस ठाण्यापासून ते वर्धा वाहतूक शाखेपर्यंतचा पोलीस निरीक्षक शेगावकर यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. खरांगणा पोलीस स्टेशन, समुद्रपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी प्रमुख म्हणून काम केले. आज ते वर्धा येथे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.
काम कोणतेही असो, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच त्यांचे मुख्य ध्येय राहिले आहे. वर्धा वाहतूक शाखेत काम करत असलेल्या पोलीस निरीक्षक शेगावकर यांच्या संदर्भात वर्धा शहरात एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने वाहने उभी करायला सुरुवात केली आहे.
पूर्वी चौकात उभे राहून ‘सावध शोधात’ असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी आता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावू लागले आहेत. याचे एक कारण म्हणजे, आता त्यांना रोज साहेबांना काही ‘देणे’ लागत नाही. आता साहेबही स्वतः फिरतात आणि कर्मचारीही सक्रियपणे कार्यरत असतात.
पूर्वी रिक्षाचालक वाहतूक पोलिसांमुळे वैतागले होते. कोपऱ्यात दबा धरून बसणारे, कुणीही सापडले तर थांबवणारे, चौकात ‘मामा आहे का’ असे एकमेकांना विचारणारे रिक्षाचालक आता शिस्तीत आहेत. हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सर्व काही शिस्तबद्धपणे सुरू आहे.
हाच खरा अधिकारी – आपल्या पदाचा आणि अधिकाराचा प्रामाणिक वापर करून जनतेत लौकिक निर्माण करणे हीच खरी पॉलिशिंग. आणि हेच पोलीस निरीक्षक शेगावकर यांनी करून दाखवले आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles