
राजे छत्रपती गृपचा स्तुत्य उपक्रम
राजे छत्रपती गृपचा स्तुत्य उपक्रम
” फादर्स डे ” निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालयात वृक्षारोपण
वर्धा(प्रति)
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पुढच्या पिढीसाठी एक चांगले आयुष्य द्यायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय कोणताही पर्याय नाही , राजे छञपती गृपचा वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ आसमवार यांनी केले.
राजे छत्रपती गृपच्या सदस्यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचा संकल्प अध्यक्ष गिरीश सावळकर केला आहे. याच निमित्ताने आज फादर्स डे निमित्त आणि श्री राजे छत्रपती’ ग्रुप चे डॉ. संदिप मांडवगडे व गिरीश वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालयात 11 (बकुळ) झाडे लावण्यात आली..
यावेळी शाळेत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अजय उंबरकर यांनी उपस्थितांना शाळेची माहिती दिली. सध्या शाळेच्या मैदानात खो खो खेळाचे सामने होत असतात. रोज खेळाडू येथे सराव करायला येत आहेत.
शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
यंदा १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जूनमध्ये पडणारा पाऊस मे महिन्यातच बरसला. देशातील शास्त्रज्ञांच्या मते निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. निसर्ग यातून आपल्याला धोक्याचे संकेत देत आहे; मात्र यातून पुढच्या पिढीसाठी एक चांगले आयुष्य द्यायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय कोणताही पर्याय नाही. प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याची गरज आहे. त्यामुळेच राजे शिवछत्रपतीगृप वृक्षारोपण करण्यासाठी तत्पर राहुन कार्य करणार आहे. राजे छत्रपती ग्रुप च्या वतीने विक्रांत भागवत कर यांनी आपले मत व्यक्त केले .ते म्हणाले कि वृक्षारोपण करून होणार नाही त्याचे संगोपन सुद्धा करणे गरजेचे आहे.
यावेळी’ राजे छत्रपती” ग्रुप चे अध्यक्ष गिरीश सावळकर,
उपाध्यक्ष प्रल्हाद मानकर,सचिव महेश मुधोळकर ,कोषाध्यक्ष गिरीश वानखेडे , संजय तिगावकर , विक्रांत भागवतकर जगदिश कामनापुरे उपस्थित होते.