वर्धा बिल्डर संघटनेच्या वादाने.अनेकांची पोलखोल

वर्धा बिल्डर संघटनेच्या वादाने.अनेकांची पोलखोल
वर्धा(मंगेश चोरे) वर्धा येथिल बिल्डर आणि डेव्हलपर. प्लॉट विक्रेते यांच्या क्रीडा इ.या संघटनेत अंतर्गत वाद उफाळला.आणि अनेक लफडे रागाच्या भरात पुढे आले.बातमी प्रकाशित होताच राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन.आपसात प्रकरण निस्तारण्या करिता प्रत्यक्ष वर्धेला येण्याचे आश्वासनही दिले.परंतु मामला पुढे आला तो वर्धेतील अनेक डेव्हलपर आणि बिल्डर यांनी. केलेल्या गैरकानुनी प्रकाराचा.वर्धेतील अनेक ठिकाणची सरकारी जागा हडपली गेली.काही ठिकाणचे सरकारी रस्ते लेआऊट मध्ये दबले.अनेक परवानग्या अनेक अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या मारून.मंजुरी दाखवली गेली.इतकेच न्हवे तर जी जमीन विकत घेताच येत नाही.ती सुद्धा विकत घेण्यात आली.या व्यतिरिक्त अनेक असे प्रकार आहेत की उघड झाल्यास.वर्धा शहरात मोठ्या रुबाबाने आणि मोठ्या थाटाने मिरवणारी मंडळी.मोठ्या वाड्यात जाऊन बसेल.आता प्रश्न येतो या प्रकरणाला उजागर करण्याचा तर यातील काही दुःखी लोकांनी हा विषय बाहेर आणला असुन सविस्तर प्रकार आमच्या कडे व्यक्त केला.दिलेल्या माहितीत केलेल्या चौकशीत अनेक प्रकार उघड उघड पुढे आले असुन.सरकारी दप्तरी आणि यांच्या कडील अनेक कागदपत्रात मोठी तफावत आहे हे प्रथमदर्शनी दिसुन आले.या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असुन पुढील बातमीत वर्धा येथील अनेक बिल्डरांची सखोल माहिती प्रकाशित करू.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles