
धोत्रा चौरस्ता येथे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन
अल्लीपूर .(राजीव गिरी) . धोत्रा येथे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज अकरा वाजता आंदोलन करण्यात आले .
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध मागण्यांकरिता प्रहार चे माजी बच्चू कडू यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतला आंदोलनाची दखल घेऊन पोलिसांनी प्रहार कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली होती मात्र तरी देखील आज प्रहार कार्यकर्त्यांद्वारा आंदोलन करण्यात आले .
शेतकऱ्यांच्या हिताकरता आंदोलन करीत असताना शेतकऱ्यांना न्याय देणे ऐवजी शेतकऱ्यांसह त्यांच्यासाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार शासनाने चालविण्याचा आरोप राहत पदाधिकाऱ्यांनी केला आहे शासनाने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा दिली होती पण ती पूर्वतास नेली नाही त्यामुळे आज धोत्रा येथील चौरस्त्यावर प्रहार द्वारा आंदोलन करण्यात
यावेळी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे सह अनेक प्रहार पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .दहा ते पंधरा मिनिट पर्यंत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हायवे रोडवर बसून घोषणा देऊन काही वेळ पर्यंत रोड वाहतूक बंद ठेवली मात्र त्यानंतर पोलिसांनी वाहतूक मोकळी केली
यावेळी पोलिसांनी पोलीस सायक निरीक्षक विजय घुले यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला