
बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी पूजनासह निष्ठावंत कार्यकर्ते रविकांत बालपांडे यांच्या निवास्थानाला दिली सदिच्छा भेट
वर्धा येथे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा दौरा – बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी पूजनासह निष्ठावंत कार्यकर्ते रविकांत बालपांडे यांच्या निवास्थानाला दिली सदिच्छा भेट
वर्धा (प्रतिनिधी) वर्धा येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्यानिमित्त काही महत्त्वपूर्ण भेटी व धार्मिक पूजन केले. राज्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आयोजित मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
<यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री. रविकांत बालपांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थीचे दर्शन घेऊन विधीवत पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
राज्याच्या राजकारणात निष्ठावान शिवसैनिकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सन्मान राखणे ही शिवसेनेची परंपरा असून, ती परंपरा आज उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुढे चालवली. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, बाळासाहेबांच्या विचारांचा प्रसार हेच आपले ध्येय असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या दौऱ्यात स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.