
*बंद पडलेल्या पावर प्लांट च्या जागी नवा उद्योग स्थापन करून युवकांना रोजगार द्या : सुनील गफाट यांची महसूल मंत्र्यांना मागणी*
*बंद पडलेल्या पावर प्लांट च्या जागी नवा उद्योग स्थापन करून युवकांना रोजगार द्या : सुनील गफाट यांची महसूल मंत्र्यांना मागणी*
(अंजी प्रतिनिधी): देवळी-पुलगाव मतदार संघातील आंजी जिल्हा परिषद क्षेत्रातील मांडवा येथे 2014 साली सुरू करण्यात आलेल्या लँको*बंद पडलेल्या नको पावर प्लांट च्या जागी नवा उद्योग स्थापन करून युवकांना रोजगार द्या : सुनील गफाट यांची महसूल मंत्र्यांना मागणी* https://maharashtranews7.live/2979/ थर्मल पावर प्रोजेक्टसाठी मांडवा, पुलई व बेलगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. काही काळ काम सुरू झाल्यानंतर मात्र प्रकल्प ठप्प झाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो पूर्णतः बंद आहे. परिणामी, या भागातील तरुणांना रोजगार मिळण्याची आशा अपुरी राहिली.
या बंद प्रकल्पाच्या जागी आता जंगल तयार झाले असून, वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शेतकरी व बेरोजगार तरुणांच्या वतीने सुनील गफाट यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, ज्या प्रकल्पासाठी जमीन घेण्यात आली होती, तो प्रकल्प ठराविक कालावधीत सुरू न झाल्यामुळे ती जमीन शासनाने परत ताब्यात घ्यावी. त्या जागेवर प्रदूषण विरहित नवा प्रकल्प उभारून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत द्यावी.
या मागणीसंदर्भात सुनील गफाट यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार राजेश वकाने यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यांनी ही मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मुंबईत लावून धरली होती.
दि. 28 जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्धा दौऱ्यावर असताना, सुनील गफाट यांच्या नेतृत्वात शेतकरी व बेरोजगार तरुणांनी पुन्हा एकदा निवेदन देऊन मागणीची आठवण करून दिली. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश वकाने तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनाची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी लवकरच मुंबई मंत्रालयात एक बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले.