म्हशींची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस – १८ जनावरे जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

म्हशींची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस – १८ जनावरे जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

वर्धा, (प्रतिनिधी)
सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येळाकेळी बसस्टॉपजवळ पोलीसांनी कारवाई करून एक आयसर ट्रक (क्र. HR 45 D 7134) पकडला असून त्यामध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असलेली १० काळ्या रंगाच्या म्हशी व ८ म्हशींचे बछडे आढळून आले. संबंधित ट्रकमध्ये जनावरांना अत्यंत कोंडवाड्यात ठेवले होते तसेच त्यांच्या तोंडाला नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधले होते. ही वाहतूक हरियाणातून तेलंगणासाठी होत असल्याचे समोर आले आहे .ही महत्त्वपूर्ण कारवाई पो.उपनिरीक्षक निलेश वाडीवा, पो.शि. अंकुश (ब.क्र. ४५४), पो.शि. अक्षय (ब.क्र. ६७७) यांनी केली. सदर जनावरे विनापरवाना वाहतूक करत असल्याने ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे अप.क्र. ६१४/२०२५ कलम ११(१)(ड)(फ) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी –
१. अमितकुमार रामपाल (ट्रकचालक), रा. वाल्मीक मोहल्ला, हसनपूर, ता. करनाल, हरियाणा
२. नवीनकुमार विरंण्णा मुडावर, रा. बाधलापरई, ता. थारीगोपुल्ला, जि. वरंगल, तेलंगणा जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने नजीकच्या गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत.ही कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. अनुराग जैन, अति. पोलीस अधीक्षक मा. श्री. सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. सावंगीचे ठाणेदार सपोनि. पंकज वाघोडे, पो.उपनि. निलेश वाडीवा, पो.उपनि. गोपाल शिंदे, पो.शि. अंकुश, पो.शि. अक्षय, चालक आकाश (ब.क्र. ५१०) यांच्या सहकार्याने पार पडली.पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून तपशीलवार चौकशी केली जात आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles