
“खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना सोडणार नाही!”
“खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना सोडणार नाही!” — मंगेश चोरे (पाटील) यांची उच्च न्यायालयात ठिणगी
नागपूर | प्रतिनिधी
एका निर्भीड पत्रकाराने पोलिस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला आणि त्याच पत्रकारावरच खोटे गुन्हे दाखल करून त्याला गोत्यात आणण्याचा कट रचण्यात आला. मात्र, या अन्यायाला झुकणारे नाही — असा निर्धार करत पत्रकार मंगेश चोरे (पाटील) यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संबंधित पाच पोलिस अधिकाऱ्यांविरोधात नवा फौजदारी खटला दाखल केला आहे.मागील काही महिन्यांत मंगेश चोरे यांनी एका वृत्तपत्रात जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्या भ्रष्टाचारावर मोठा खुलासा केला होता. हा खुलासा पुढे अधिक मोठा होईल, हे लक्षात येताच, तत्कालीन एसपीने पाच पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून चोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्र रचले.
या प्रकरणात कसलाही ठोस पुरावा नसताना, चोरे यांना तब्बल बारा दिवस कारागृहात राहावे लागले.
“बारा दिवस तुरुंगात गेलो म्हणजे आमची जिरली, असे कोणी समजू नये. अन्याय सहन करणे, हा देखील गुन्हा आहे — त्यामुळे आम्ही याचा कायदेशीर लढा देणारच,” अशी ठाम भूमिका चोरे यांनी घेतली आहे.
कोणत्या कलमांतर्गत खटला दाखल?
या प्रकरणात त्यांनी IPC कलम 120(B) (षड्यंत्र), 167 (खोटा सरकारी दस्तऐवज), 118, 119 (गुप्त माहिती दडपली), 211 (खोटा गुन्हा दाखल करणे), 141 व 142 (बेकायदेशीर जमाव) यांतर्गत खटला दाखल केला आहे.या प्रकरणात एसपीने थेट तोंडी आदेश दिले आणि गुन्हे ठाणेदारांकडून दाखल करवून घेतले. त्यामुळे एसपीविरोधात ठोस पुरावा मिळणे कठीण जाणार, असे संकेत असताना —चोरे यांच्या कायदेशीर लढ्याच्या भीतीने काही अधिकाऱ्यांनीच न्यायालयात शपथपत्र देत कबुली दिली आहे, ही महत्त्वाची घडामोड ठरली.राज्यात अनेक ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर पत्रकारांना लक्ष्य केल्याचे प्रकार घडले आहेत. चोरे यांनी सांगितले की, “हे प्रकरण फक्त माझे नाही, तर संपूर्ण निर्भीड पत्रकारितेच्या अस्तित्वाचे आहे. आपण शेवटपर्यंत लढत राहणार, हा खटला सत्तेच्या दडपशाहीविरोधात एक लढा आहे.”