
अवैध डिझेल विक्रीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; ११,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वर्धा, सावंगी मेघे — अवैध डिझेल विक्रीप्रकरणी सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या पथकाने मौजा सेलुकाटे परिसरात धडक कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे ११,३०० रुपयांचा अवैध डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील पथक पेट्रोलिंग दरम्यान गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, मौजा सेलुकाटे येथील रूपेश अरुण वाणी (वय ४१) व मदन सुखचंद धुवारे (वय ४६) हे दोघे आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणावर डिझेलचा अवैध साठा करून त्याची चोरटी विक्री करत आहेत.
त्यानुसार पोलीस पथकाने पंचासह रूपेश वाणी याच्या घरावर छापा टाकून टिनाच्या शेडमध्ये ठेवलेला डिझेल जप्त केला. तपासणीत खालीलप्रमाणे डिझेल व कंटेनर सापडले:दोन मोठ्या गोल प्लास्टिक कॅन – प्रत्येकी २० लिटर डिझेल (एकूण ४० लिटर)किंमत: ₹९० प्रति लिटर प्रमाणे ₹३,६०० कॅन किंमत: ₹२०० प्रति कॅन प्रमाणे ₹४००एक मोठा प्लास्टिक कॅन – २५ लिटर डिझेलकिंमत: ₹९० प्रति लिटर प्रमाणे ₹२,२५० कॅन किंमत: ₹४००एक मोठा गोल प्लास्टिक कॅन – ४५ लिटर डिझेल किंमत: ₹९० प्रति लिटर प्रमाणे ₹४,०५० कॅन किंमत: ₹६००एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹११,३००डिझेलचा साठा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, निष्काळजीपणे ठेवलेला आढळल्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध लेखी फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोउपनि गोपाल शिंदे, पोहवा चंदू सानोने (ब.नं. 910), पोशि वैभव जगणे (ब.नं. 1555), चालक पोशि सुमित राठोड (ब.नं. 257) यांनी केली.