
वर्ध्यात वाहतूक शिस्तीचा बोजवारा..
क्या बात है….
(विशेष प्रतिनिधी) वर्धा, स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील एक पवित्र ठिकाण. इथे महात्मा गांधींचा वारसा, विनोबा भावे यांची प्रेरणा आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष जिवंत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्यासोबत आलेली शिस्त मात्र हळूहळू हरवली आहे.आजच्या वर्ध्यात, कायद्याचे पालन करणारेच कायद्याला हरताळ फासतात, हे दृश्य पाहून कोणाच्याही मनात खंत निर्माण होईल. शहराच्या मध्यवर्ती बजाज चौकात आज रात्री आठ वाजताचा प्रकार बघा . हे ठळक उदाहरण आहे.कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दृश्यात, वाहतूक शाखेच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची अवस्था पाहून नागरिकांनी चकित व्हावे की संतापावे, असा प्रश्न निर्माण होतो. रस्त्यात थेट वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची वाहने उभी — त्यावर बसून, कर्तव्य सोडून, गप्पांचा फड रंगवला जात होता. विशेष म्हणजे, हे कर्मचारी पुरुष नव्हते तर महिला होत्या.वाहतुकीच्या मध्यवर्ती ठिकाणी, शेकडो वाहनांच्या गर्दीत, कर्तव्याला हरताळ फासून गप्पांचा अड्डा मांडला जाणे, हा केवळ शिस्तभंग नाही, तर पोलिस विभागाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवणारा प्रकार आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेच्या लक्षात आल्यानंतर, त्या त्वरेने तेथून निघून गेल्या, पण तोपर्यंत दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त झाले होते.हे केवळ एक दिवसाचे उदाहरण नाही. शहरातील अनेक नागरिकांचा अनुभव सांगतो की, वाहतूक शाखेत काम करणारे काही कर्मचारी कर्तव्यापेक्षा वसुलीला जास्त प्राधान्य देतात. गरीब आणि असहाय्य वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाते, पण .वर्ध्याची वाहतूक शाखा ही फक्त वसुलीचे केंद्र झाले आहे का? की ती खरंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहे? हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वरिष्ठ अधिकारी या प्रकारांकडे कितपत लक्ष देतात, हा देखील संशयाचा मुद्दा ठरतो. कारण लायक अधिक्षक आलेत तर , अशा कर्मचाऱ्यांची मनमानी बोकाळते. मात्र नालायक आले की हे कर्मचारी फाटून काम करतात.यात सर्व कर्मचारी तसे नाहीत . केवळ कर्मचाऱ्यांना बदमाम करणारे निवडक कामचोर.आणि चापलूस आहेत.आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, वाहतूक शिस्त ही फक्त कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात, शहराच्या हृदयस्थानीच कायद्याचा भंग केला जातो, आणि तोसुद्धा कायदा राबवणाऱ्यांकडून.
प्रश्न असा आहे — अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? की हा प्रकारही “सगळं माहीत असूनही” गप्प बसण्यात जाईल?
“हे वर्ध्याचे पोलिस नाहीत, तर आपल्या विश्वासाचा भंग करणारे कर्मचारी आहेत. शिस्त परत मिळवायची असेल, तर वरिष्ठांनी डोळसपणे पावले उचलायला हवीत. नाहीतर वाहतूक शिस्त ही केवळ पुस्तकात उरून जाईल.”