अल्लीपूर परिसरात यशोदा नदीचा चौथ्यांदा पूर – ४०० हेक्टर शेती जलमय

अल्लीपूर परिसरात यशोदा नदीचा चौथ्यांदा पूर ४०० हेक्टर शेती जलमय, शेतकरी अडचणीत

अल्लीपूर(राजीव गिरी) आमचे प्रतिनिधी यांचे कडून.

अल्लीपूर परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा पावसाळी आपत्तीच्या विळख्यात सापडले आहेत. दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजतापासून सुरू झालेला संततधार पाऊस आणि गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन यामुळे शेतकरी वर्ग काहीसा आनंदी झाला असला तरी यशोदा नदीच्या पूरस्थितीने हा आनंद अल्पायुषी ठरला आहे.

पूरग्रस्त गावे व क्षेत्र
अल्लीपूर परिसरातील निमसडा, टाकळी दरणे, अलमडोह, सोनेगाव, पवणी, गाडेगाव, चाणकी, भगवा या गावांच्या शिवारातील सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रातील शेती चौथ्यांदा पाण्याखाली गेली आहे. सततच्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान – मदतीसाठी प्रतिक्षा
या भागातील पिकांचे नुकसान अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला व इतर हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीही तातडीची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. पंचनाम्याच्या प्रक्रियेतही गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

पंचनाम्यात अन्याय?
अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, तलाठ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात अनेक पूरग्रस्त शेतकऱ्यांची नावे नोंदवलीच नाहीत, परिणामी शासनाच्या मदतीपासून ते वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी शासनाकडे फेर सर्वेक्षण करून सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश करावा आणि तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. पूरग्रस्त भागाला तत्काळ मदत पोहोचवून शेतकऱ्यांना दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. …………………………………………………..

भगवा ते चानकी मार्ग बंदअल्लीपूर ते कानगाव आणि भगवा ते चाणकी मार्ग यशोदा नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे बंदनदी, नाले तुडुंब, यशोदा नदीला पूर, नदीकाठावरील शेती पाण्याखाली,


 

 


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles