
अखेर कार्यकारी अभियंता श्री. सतीश अंभोरे आणि अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने बजाज चौकातील पूल पूर्णत्वास गेला.
अखेर कार्यकारी अभियंता श्री. सतीश अंभोरे आणि अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने बजाज चौकातील पूल पूर्णत्वास गेला.
कार्यकारी अभियंता श्री.सतीश अंभोरे वर्धा
वर्धा (मंगेश चोरे) : वर्धा येथील अत्यंत गरजेचा असलेला बजाज चौकातील पूल अखेर पूर्ण झाला. कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेला हा पूल नुकताच पूर्ण झाला. या पुलाला पूर्ण करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी दिल्लीपर्यंत भक्कम पाठपुरावा केला. या उपरांत वर्धा येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सतीश अंभोरे यांनी मोलाची कामगिरी बजावली.वास्तविक हा पूल रेल्वे उड्डाण पूल असल्याने, त्याला पूर्ण करण्यासाठी ‘मेगा ब्लॉक’ घ्यावा लागतो. याकरिता रेल्वे विभागाच्या अनेक जाचक अटी असतात. त्या अटी पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा आवश्यक असतो. वर्धेकरांची ही अत्यंत गरजेची बाब समजून ही मोलाची जबाबदारी कार्यकारी अभियंता श्री. सतीश अंभोरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.लोकप्रतिनिधींनी हा पूल तातडीने सुरू करण्याचा ध्यास घेतलाच होता, त्यात भर अंभोरे यांनी घातली. वर्षातील हा पहिला ट्रस पूल असून, अंभोरे यांनी नागपूर जिल्ह्यातील भारतातील एकमेव अंबोरा तीर्थक्षेत्र येथे बांधण्यात आलेल्या ‘केबल स्टेड पूलाची’ डिझाईन स्वतः तयार केल्याचा अनुभव लाभला होता. तसेच यापूर्वी अंभोरे नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाग क्र. ३ मध्ये कार्यरत होते. त्यामुळे नागपूर रेल्वे डीआरएम कार्यालयातील ओळखीचा फायदा झाला आणि अखेर रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळवून पूल पूर्णत्वास गेला.आता या मार्गात विद्युत खांब हा एकमेव अडथळा आहे. तो लवकरात लवकर दूर करून हा पूल जनतेच्या सेवेत द्यावा, अशी वर्धेकरांची मागणी आहे.