
पक्षप्रवेश : माजी आमदार प्रा. राजु तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात)
पक्षप्रवेश सोहळा : माजी आमदार प्रा. राजुभाऊ तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात)
हिंगणघाट (प्रतिनिधी)
हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी (रेल्वे) मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा देणारी ऐतिहासिक घटना आज घडली. माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.या पक्षप्रवेशामुळे हिंगणघाट तालुका तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संघटना आणखी भक्कम होणार असल्याचे बोलले जात आहे.कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळून प्रा. तिमांडे आणि त्यांच्या समर्थकांचे जोरदार स्वागत करण्यात आले.अजित पवार यांचे मार्गदर्शन यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “राजु तिमांडे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला ग्रामीण भागात नवे बळ मिळणार असून, पुढील निवडणुकांत मतदारसंघात निर्णायक विजय मिळविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”प्रा. तिमांडे यांची भूमिकाआपल्या प्रवेशाबाबत बोलताना प्रा. तिमांडे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, तरुणांना दिशा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहोत. राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चिन्हेया पक्षप्रवेशानंतर मतदारसंघातील आगामी निवडणुकीत समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण वर्ग व शेतकरी समाज तिमांडे यांच्या पाठिशी असल्याने हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी फायदेशीर ठरणार आहे.