
नरेश उर्फ बाबु सोनटक्के यांच्या निधनाने कसबा आर्वीत शोककळा 🕊️
नरेश उर्फ बाबु सोनटक्के यांच्या निधनाने कसबा आर्वीत शोककळा 🕊️
आर्वी प्रतिनिधी –
कसबा आर्वी येथील होतकरू तरुण नरेश उर्फ बाबु अजाबराव सोनटक्के (वय ४९ वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.
धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले नरेश सोनटक्के यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण कसबा आर्वी परिसरात शोककळा पसरली आहे.
मयुरा अमर काळे, अजिंक्य अमर काळे तसेच दादाराव केचे यांनी वैयक्तिकरित्या भेट देऊन कुटुंबियांचे सात्वन केले. त्यांच्या अंत्ययात्रेला आर्वीतील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.