ट्युशनहून परतताना अपघातात विद्यार्थी ठार, एक गंभीर

ट्युशनहून परतताना अपघातात विद्यार्थी ठार, एक गंभीर

वर्धा :(प्रति)
       रामनगर येथील भगतसिंग चौक परिसरात २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

सावंगी (मेघे) येथील आरुष संजू मांडवे (वय १५) व द्वारकानगर, सिंदी (मेघे) येथील मिथील प्रफुल्ल मांढरे (वय १५) हे दोघे शिकवणी वर्ग आटोपून दुचाकीने घरी परतत असताना हा अपघात घडला. दरम्यान, गिट्टी घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम.एच.४० एन.१५६७) आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात आरुष मांडवे याचा जागीच मृत्यू झाला, तर मिथील मांढरे गंभीर जखमी झाला असून त्याला सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय भुसारी, उपनिरीक्षक विजय गिरमकर, तसेच कर्मचारी राजेश साहू, सुरज राठोड, मनीष राठोड आणि समीर गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाला ताब्यात घेतले असून, रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles