
धडाकेबाज पोलिस कारवाई – जुगार अड्ड्यावर छापा, तब्बल ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त,
धडाकेबाज पोलिस कारवाई – जुगार अड्ड्यावर छापा, तब्बल ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त,
पुलगाव :(pratinidhi) पोलिसांनी खात्रीशीर माहितीच्या आधारे पुलगाव परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकत ९ आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ७४ लाख ८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई मुखबिराच्या खात्रीशीर माहितीवरून पंचासमक्ष करण्यात आली. छाप्यात आरोपींच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली.रोख रक्कम : ₹४,४९,१३०/-मोबाईल फोन्स : १२ (अॅपल, सॅमसंग, वनप्लस, वीवो, ओपो, रेडमी) – एकूण किंमत अंदाजे ₹३,१४,०००/-वाहने : किया, स्कॉर्पिओ, रेनॉल्ट व टाटा अशा चार गाड्या किंमत सुमारे ₹६४ लाख होंडा दुचाकी : ₹६०,०००/पत्त्यांचा ताश : ₹५०/-एकूण जप्त मालमत्ता : ₹७४,०८,१८०/-या प्रकरणी किशोर चुन्नेलाल कल्पे, प्रमोद मदनलाल हरणे, प्रमोद नारायण घालनी, नितीन बापुराव रघाटाटे, कैलाश हुकुमचंद धारवाटकर, भुषण मनोहर वाघमारे, आशीष बाबाराव सावरकर, रितीष उल्लासराव चौरे व दत्तात्रय उत्तमराव बिरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.