
वर्धा बस स्टँडजवळील एटीएममध्ये पैसे काढताना घडलेली तफावत
वर्धा बस स्टँडजवळील एटीएममध्ये पैसे काढताना घडलेली तफावत
फोटोमध्ये दिसत असल्या प्रमाणे,पैसे दिसत असलेल्या ब्लेड मुळे हा प्रकार होत होता.याला जबादार कोण?
वर्धा(प्रतिनिधी)
वर्धा, ३१ ऑगस्ट २०२५: संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता वर्धा बस स्थानकासमोरील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये एक अनोखी व विचार करायला लावणारी घटना घडली. शुभम भगत या स्थानिक नागरिकाने ₹५०० काढण्यासाठी एटीएम वापरला असता, त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाले मात्र मशीनने पैसे बाहेर न काढता काही क्षणांनी पुन्हा खात्यात जमा केले.या दरम्यान, त्यांना कॅश स्लॉटमध्ये ₹१००० अडकलेले आढळले. बाजूला उभ्या असलेल्या एका जोडप्याने तत्काळ नमूद केले की त्यांनी थोड्याच वेळापूर्वी ₹१००० काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पैसे मिळाले नव्हते. परिस्थितीचे आकलन झाल्यावर शुभम भगत यांनी प्रामाणिकपणे ती रक्कम त्या जोडप्याला परत केली.ही घटना संबंधित एटीएमच्या सीसीटीव्ही फूटेजद्वारे पडताळता येऊ शकते. शुभम भगत यांनी हा प्रकार बँकेकडे अधिकृतरीत्या नोंदवण्याची विनंती करत पारदर्शकतेची मागणी केली आहे, तसेच अशा प्रकारच्या यांत्रिक चुकांकडे बँकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सूचित केले आहे.ही घटना केवळ बँकिंग प्रणालीतील एक विसंगती दर्शवतेच असे नाही, तर नागरिकांची प्रामाणिक वृत्ती व सामाजिक जबाबदारीदेखील अधोरेखित करते.