
पत्रकार संजय ओझा यांच्यावर सहा न्यायालयात मानहानी दावे दाखलमुंबई, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर व वर्धा न्यायालयात प्रक्रिया सुरू
पत्रकार संजय ओझा यांच्यावर सहा न्यायालयात मानहानी दावे दाखल
मुंबई, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर व वर्धा न्यायालयात प्रक्रिया सुरू
हाच तो पत्रकार संजय ओझा,जो बदनामी करण्याच्या बातम्या पैसे घेऊन प्रकाशित करतो,
वर्धा (प्रतिनिधी) : वर्धा येथील एका हिंदी दैनिकातील पत्रकार संजय ओझा यांच्या विरोधात सहा ठिकाणी मानहानीचे दावे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा येथील न्यायालयांमध्ये स्वतंत्रपणे ही प्रकरणे दाखल झाली असून, आगामी काळात ओझा यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
संजय ओझा यांनी मागील काही काळात ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष व संपादक मंगेश चोरे (पाटील) यांच्या विरोधात सातत्याने बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्या होत्या. या बातम्यांमुळे चोरे यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी तक्रार संबंधितांनी केली आहे. ओझा यांनी दिलेल्या कायदेशीर नोटिसेस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, थेट न्यायालयात मानहानीचे खटले दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
चोरे यांचे काही नातलग व समर्थक तसेच पत्रकार संघाशी निगडित पदाधिकाऱ्यांनी फिर्यादी म्हणून पुढाकार घेतला. पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यासह मानहानीच्या दाव्यांची तयारी करण्यात आली. मागील दोन वर्षांत संजय ओझा यांनी विरोधकांकडून पैशाच्या मोबदल्यात किंवा जाणीवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित करून चोरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादींकडून करण्यात आला आहे.
आगामी काही दिवसांत ओझा यांना संबंधित सहा न्यायालयांत उपस्थित राहण्याची तसेच न्यायालयीन जामीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची नोटीस बजावली जाणार आहे. या खटल्यात ॲड. विलास डोंगरे व ॲड. कुमारी वैष्णवी चोरे न्यायालयीन बाजू मांडणार आहेत.