
सावंगी : आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालयातील गणपती रोषणाईला शॉर्टसर्किटमुळे आग
सावंगी : आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालयातील गणपती रोषणाईला शॉर्टसर्किटमुळे आग
सावंगी येथील आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालयात गणपती उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या रोषणाईला आज अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा अप्रिय घटना घडली नाही.
प्राप्त माहितीनुसार, उपस्थितांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य विद्युत रोषणाई लावण्यात आली होती. मात्र सतत सुरू असलेला पाऊस आणि तांत्रिक बिघाड यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.