महाकाळ येथे धाम नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

महाकाळ येथे धाम नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

 

सावंगी (प्रतिनिधी):
        महाकाळ येथील पुरुषोत्तम घुलबाजी देहरे (५८) हे धाम नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. सलग दोन दिवस चाललेल्या शोधमोहीमेनंतर अखेर त्यांचा मृतदेह मौजा महाकाळ येथील पुलापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आढळून आला.दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोलिस पाटलांनी घटनेची माहिती सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यास दिली होती. त्यानंतर पोलिस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

          मात्र सततच्या पावसामुळे वाढलेला नदीचा वेग व प्रतिकूल हवामानामुळे मोहिमेत अडचणी येत होत्या.यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात. श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलिस अधीक्षक, वर्धा .मा. श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग वर्धा सपोनि. पंकज वाघोडे, ठाणेदार, सावंगी (मेघे) पोलिस ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता नदीपात्रात मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून तो सर्वोपचार रुग्णालय, वर्धा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास सपोनि. पंकज वाघोडे, ठाणेदार, सावंगी (मेघे) हे करीत आहेत.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles