
शेतकऱ्यांचा तारणहार – आमदार राजेशजी बकाने
शेतकऱ्यांचा तारणहार – आमदार राजेशजी बकाने
वर्धा (प्रतिनिधी)देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर परिसरात तब्बल १५० एकरांवरील सोयाबीन व कपाशीचे पीक “क्रॉप केमिकल्स इंडिया लिमिटेड”च्या लुडो (Diafenthiuron 50% WP) या कीटकनाशकामुळे जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश बकाने साहेबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांनी प्रशासनाला ठाम निर्देश दिले की, तातडीने पंचनामा करून मदत मिळवून द्यावी तसेच दोषी कंपनीवर कठोर कारवाई करावी.
पाहणीवेळी तहसीलदार श्री. समर्थ क्षीरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी सौ. वैष्णवी शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे, तालुका कृषी अधिकारी सौ. प्रतिक्षा मेंढे, कृषी तंत्र अधिकारी महेश खर्डे, पोलीस निरीक्षक श्री. अमोल मंडळकर, श्री. राहुलजी चोपडा, श्री. सचिन कुऱ्हाडकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमी पुढाकार घेणारे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे नेते म्हणून आमदार राजेश बकाने यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. त्यांच्या संघर्षशील नेतृत्वामुळे शेतकरी बांधवांच्या मनात आजही विश्वास निर्माण झाला आहे.