
अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जप्त, दोन आरोपींवर गुन्हा दाखल
अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जप्त, दोन आरोपींवर गुन्हा दाखल
वर्धा, ( शहर प्रतिनिधी)वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने आज दुपारी मोठी कारवाई करत अवैध पद्धतीने शासकीय गौण खनिज रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाला दुपारी 2 वाजताच्या सुमारास उडानपुलाजवळ बिना नंबरची ट्रॉली असलेले ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना दिसून आले. ट्रॅक्टर चालक भूषण शंकरराव कोल्हे (रा. बरबडी) व सोबत असलेला क्लीन्नर वामन हनुमंतराव मंजुळकर (रा. पिंपरी) यांना रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना व रॉयल्टी TP बाबत विचारणा केली असता त्यांनी तो नसल्याचे स्पष्ट केले.यावरून ट्रॅक्टर (स्वराज कंपनी, क्र. MH 32 P 4378 – किंमत सुमारे 6 लाख), बिना नंबरची ट्रॉली (किंमत 1.50 लाख), 2 ब्रास रेती (किंमत 12 हजार), तसेच टोपली व फावडे असा एकूण ₹7,62,700 किमतीचा मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला.या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 379, खान व गौण खनिज नियमन अधिनियम कलम 21(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून वर्धा शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहेत.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार येळणे, पो.हवा. किशोर पाटील, पो.हवा. आशिष देशमुख व चालक स्वप्नील तंबाखे यांच्या पथकाने केली.