
“आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलन कार्यक्रम नव्हे” – ॲड. अंजली साळवे
“आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलन कार्यक्रम नव्हे” – ॲड. अंजली साळवे
ओबीसी आरक्षणाबाबत समाजाची अनभिज्ञता – वर्ध्यात भव्य जनजागृती कार्यक्रम
वर्धा (सूर्यप्रकाश पांडे)ओबीसी जनजागृती संघटन, जिल्हा वर्धा यांच्या वतीने “ओबीसी आरक्षणाबद्दल समाजाची अनभिज्ञता” या विषयावर विठ्ठल-रुक्मिणी सभागृह, आर्वी रोड येथे भव्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने सभागृह श्रोत्यांनी फुलून गेले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सत्यशोधक समाज जिल्हा वर्ध्याचे माजी अध्यक्ष प्रा. जनार्धन देवतळे यांनी भूषविले. तर मुख्य वक्त्या म्हणून ओबीसी अभ्यासक व माजी सदस्य, राष्ट्रीय महिला आयोग (नवी दिल्ली) डॉ. ॲड. अंजली साळवे यांनी मार्गदर्शन केले.डॉ. साळवे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून ओबीसी आरक्षणाचा इतिहास, न्यायालयीन निर्णय आणि शासन धोरणांचा आढावा घेतला. समाजात अजूनही आरक्षणाबाबत अनेक गैरसमज असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की – “आरक्षण ही भीक नसून घटनादत्त हमी आहे. ते गरिबी निर्मूलनासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी आहे.” युवकांनी स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक संधी आणि सरकारी नोकऱ्यांबाबत सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ सौ. अर्चना भोमले, काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ माऊस्कर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे उपस्थित होते.सौ. अर्चना भोमले यांनी आपल्या भाषणात ओबीसी समाजाने हक्कांसाठी जागरूक राहण्याची व संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. अध्यक्ष प्रा. देवतळे यांनी ओबीसी जनजागृती संघटनेच्या कार्याचा गौरव करताना, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरक्षणाचा योग्य संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात ओबीसी प्रवर्गातील विविध जाती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शंकर घपाट यांनी संचालन केले, अजय भेंडे यांनी प्रास्ताविक तर प्रशांत वाटाणे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमात नागरी सहकारी संस्था, महिला संघटन तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओबीसी जनजागृती संघटन, जिल्हा वर्धा चे पदाधिकारी मनोहर खर्चे, रविंद्र चौधरी, राजेंद्र इंगोले, जयवंत भालेराव, प्रविण पेठे, रंजित सुरकार, राजेश माथनकर, उमेश गडधनी, नामदेव ढुमणे, नितीन कुंबलवार, विक्रम राऊत, जयंत पुसदेकर, सोमंता फुटाणे, नितीन धोपटे, सुर्यप्रकाश पांडे, शंकर घपाट, विवेक वझरकर, सचिन वानखडे, रविभुषन तांगडे, ॲड. अरूण येवले आदींनी विशेष परिश्रम घेतले.महिला संघटनेतून रश्मी भेडे, कोमल वाटाणे, कांचन जानोतकर, रिता झाडे, प्रज्ञा चौधरी, ममता कुहिटे, अनिता घपाट, शितल पुसदेकर, चैताली नांदुरकर, मनिषा भेंडे, सिमा वानखेडे, वैशाली पांडे, सरिता धोपटे, हर्षा इंगोले आदींनी योगदान दिले.