
साहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना राष्ट्रपती पोलिस पदक
साहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना राष्ट्रपती पोलिस पदक
वर्धा : जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय व न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी विद्यार्थी तसेच स्नेहलनगर येथील रहिवासी सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र कृष्णराव हिवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.
१९९३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीनंतर त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर ग्रामीण व नागपूर शहर अशा विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून गुन्हे तपासात व कायदा-सुव्यवस्था राखण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
हिवरे यांनी आजवर ३५६ हून अधिक पुरस्कार प्राप्त केले असून, त्यामध्ये २०२० मध्ये भारताचे गृहमंत्री यांच्याकडून राज्याचे उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून पदक व प्रशस्तीपत्र, २००४ मध्ये तिहेरी खुनाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालकांचा सन्मान, २०१८ मधील इनसिंगनिया पुरस्कार, तसेच कोरोना काळातील विशेष सेवेसाठी मिळालेला सन्मान यांचा समावेश आहे.