

वर्धा (प्रतिनिधी) : आर्वी येथील रहिवाशी डॉक्टर शामसुंदर भुतडा यांच्या विरोधात अमरावती येथे एका परिचारिकेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील पोटे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर भुतडा हे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेथील एका परिचारिकेला “बढती देतो” असे सांगून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपी डॉक्टरांनी त्या परिचारिकेच्या मुलीला देखील पाठविण्याची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.घडलेल्या घटनेनंतर धाडस करून संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला असून डॉक्टर भुतडा सध्या फरार आहेत. अमरावती पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.डॉ. भुतडा हे आर्वी येथील रहिवाशी असून, काही काळ एका प्रसिद्ध दैनिकाचे पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यानंतर सावंगी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात दीर्घकाळ डीन पदावर कार्यरत होते.