
पेट्रोल–डिझेल माफियाचा डॉन गिरीश राजपाल.उर्फ बुकऱ्या
पेट्रोल–डिझेल माफियाचा डॉन गिरीश राजपाल.उर्फ बुकऱ्या ?
पोलिसांचा पंप रोखणारा हाच तो , प्रशासन मात्र गप्प!
वर्धा (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल चोरीचे रॅकेट धुमाकूळ घालत असताना, या काळ्या कारभाराचा एकमेव खरेदीदार व तस्कर म्हणून नाव पुढे येत आहे गिरीश राजपाल उर्फ बुकऱ्या याचे. विशेष म्हणजे, पोलिसांचा पेट्रोल पंप त्याच्या पंपाजवळ उभारला जाणार असल्याचे समजताच राजपालने कागदी घोडे नाचवून पंप होऊच दिला नाही. काही सामाजिक संघटनांच्या विरोधाचा त्याला फायदा मिळाला आणि पोलिस पंपाचा मार्ग रोखला गेला.जिल्ह्यात ठिकठिकाणी टँकरमधून पेट्रोल-डिझेलची चोरी होत असल्याच्या घटना वारंवार उघड होत आहेत. एवढे चोरीचे इंधन जाते कुठे? याचे उत्तर एकच राजपाल!
मोबाईल टँकरमधून थेट राजपालकडे डिझेल-पेट्रोल पोहोचते आणि महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नियमित हिस्सा देत हा काळाबाजार सर्रास सुरू आहे.राजपालकडे आलेल्या इंधनाचा हिशेब तपासला तर कुठेही ताळमेळ सापडत नाही, अशी कबुली त्याचेच काही कर्मचारी देत आहेत. शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण बंधनकारक केल्यापासून तर या ‘डॉन’ने आणखी धूर्त खेळी केली. पेट्रोलमध्ये जास्त प्रमाणात इथेनॉल मिळविणे चालू केले यामुळे अनेक वाहनधारक बोंब मरताना दिसते. त्यामुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारी पेट्रोल कंपनीपर्यंत पोहोचल्या असून, एका लोकप्रतिनिधीने याबाबत थेट कंपनीला पत्रही दिल्याचे समजते
- पोलिसांचा पंप रोखणाऱ्या राजपालच्या दबावाला प्रशासन बळी का पडते?
- महसूल आणि इतर विभाग त्याच्या कारभाराकडे डोळेझाक का करतात?
- चोरीचे डिझेल-पेट्रोल खुलेआम विकले जात असताना कारवाई का होत नाही?
- जिल्ह्यातील जनतेतून आता ठाम मागणी होत आहे गिरीश राजपाल उर्फ बुकऱ्या याचा काळाबाजार उघडकीस आणून, त्याच्या पंपाची तपासणी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.