
नागपूर विभागाला नवे नेतृत्व : माजी पोलीस अधीक्षक रवींद्र कानफाडे अध्यक्षपदी निवड
नागपूर विभागाला नवे नेतृत्व : माजी पोलीस अधीक्षक रवींद्र कानफाडे अध्यक्षपदी निवड
नागपूर (प्रती) : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, मुंबईतर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत नागपूर विभागासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नागपूर शहर व नागपूर ग्रामीण विभागासाठी संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणून माजी पोलीस अधीक्षक रवींद्र कानफाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.या निवडीमुळे नागपूर विभागातील संघटनेच्या कामकाजाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कार्याध्यक्ष सुखानंद साब्दे यांनी नव्या अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे श्री. पलंदरकर यांनी आरोग्य कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती.पलंदरकर यांच्या कार्यकाळाचे कौतुक करताना साब्दे म्हणाले, “त्यांनी नागपूर विभागात अध्यक्ष म्हणून जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली. त्यांच्या योगदानाबद्दल संघटना मनःपूर्वक आभारी आहे.