
लग्नाचे आमिष देऊन नायब तहसीलदाराचा अमानुष उपद्व्याप!
लग्नाचे आमिष देऊन नायब तहसीलदाराचा अमानुष उपद्व्याप!
महिलेचे शारीरिक शोषण , मानवाधिकार संघाकडे तक्रार
हेच ते वर्धेचे नायब तहसीलदार साहेब दौडीत लपवितात पैसे, कांड करतात कैसे कैसे
____________________________________________
वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील):
वर्धा जिल्यात प्रशासनाच्या गडाला हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील नायब तहसीलदार श्री. अजय धर्माधिकारी यांच्यावर एका महिलेच्या आयुष्याशी खेळल्याचा गंभीर आरोप झाला आहे.धंतोली परिसरातील पीडित महिलेचे आरोप आहेत की, धर्माधिकारी यांनी “नोकरी लावून देतो, तुझ्याशी लग्न करतो” अशा आमिषाने तिचा वारंवार शारीरिक उपभोग घेतला. परंतु प्रत्यक्षात फसवणूक झाल्याचे समजताच तिने वर्धा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार पराग पोटे यांच्याकडे धाव घेतली.मात्र, ठाणेदार पोटे यांनी तक्रार दाबून ठेवली, अशी पीडितेची धक्कादायक व्यथा आहे. एवढेच नव्हे तर पोटे यांच्याविरुद्धही दुसऱ्या एका महिलेने शारीरिक शोषणाची तक्रार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.“चोर चोर मावस भाऊ” अशी म्हण खरी ठरावी असा प्रकार घडला असून नायब तहसीलदार धर्माधिकारी आणि ठाणेदार पोटे हे दोघेही गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत.मानवाधिकार संघाचे राज्याध्यक्ष श्री. मंगेश चोरे (पाटील) यांच्याकडे पीडित महिलेने पुरावे सादर केले असून त्यावरून धर्माधिकारी यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट होते. महिलेच्या मोबाईलवरील धर्माधिकारी यांचे अंगावर शहारे आणणारे अश्लील मेसेजेस पाहताच त्यांची वासनेची पातळी समोर येते. कायदा सामान्यांसाठी वेगळा आणि अधिकार्यांसाठी वेगळा आहे का?
जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग यावर कारवाई करणार का?
पीडितेला न्याय मिळेल की फाईल दाबून टाकली जाईल? या प्रकरणाने जिल्हा प्रशासन, पोलीस खातं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “महिला सुरक्षित नाहीत, मग कायदाच उध्वस्त झाला का?” असा जळजळीत सवाल जनतेतून विचारला जात आहे.हा प्रकार फक्त एका महिलेवर अन्याय नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थेला धक्का आहे. पुढील भागात धर्माधिकारी यांचे मेसेजेस, पीडितेची व्यथा आणि पुराव्यांचे उघड विवरण…वाचा…