कंत्राटदार संघटनांची मुख्यमंत्र्यांना भेट : थकबाकी देयकांचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन

कंत्राटदार संघटनांची मुख्यमंत्र्यांना भेट : थकबाकी देयकांचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन

नागपूर, (प्रतिनिधी)
महाराष्ट्र कंत्राटदार संघटना, विदर्भ कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, नागपूर कंत्राटदार संघटना व नागपूर ग्रामीण कंत्राटदार संघटना या संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची रामगिरी निवासस्थानी भेट घेतली.

या वेळी शिष्टमंडळाने आपल्या दोन कंत्राटदार बांधवांच्या — स्व. हर्षल पाटील व स्व. मुन्‍ना वर्मा — आत्महत्येच्या दुःखद घटना मांडल्या. त्यांनी सांगितले की सध्या राज्यातील कंत्राटदार अतिशय कठीण परिस्थितीत आहेत, कर्जबाजारी झाले आहेत, हतबल झाले आहेत व त्यांचा संयम संपत चालला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, थकबाकी बिलांच्या संदर्भात योग्य ती न्याय्य कार्यवाही पंधरा दिवसांत केली जाईल. तसेच पुढील चर्चेसाठी मुंबई येथे वेळ देण्यासही ते सहमत झाले.

या प्रसंगी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. संजय माईंद, विदर्भ कंत्राटदार संघटनेचे सचिव नितीन साळवे, महासंघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष व नागपूर कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष श्री. सुबोध सरोदे, राज्य संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिपेश कोलुर्वार तसेच नागपूर ग्रामीण कंत्राटदार संघटनेचे कृष्णा हिंदुस्थानी, मुरलीधर आमधरे व गौरव धोटे उपस्थित होते.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles