
हिंगणघाट डीबी पथकाची प्रभावी कारवाई – खुनाचा उलगडा, तिघे आरोपी अटकेत
हिंगणघाट डीबी पथकाची प्रभावी कारवाई – खुनाचा उलगडा, तिघे आरोपी अटकेत
Hingangaht( Ikbaal palelwan)
हिंगणघाट शहरात व्याजाच्या पैशावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या तातडीच्या तपास आणि कारवाईमुळे अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा होऊन तिघा आरोपींना अटक करण्यात आली.
फिर्यादी ज्योती मनोज वेदी (वय 32, रा. निशाणपुरा वार्ड, हिंगणघाट) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती मनोज क्षत्रपाल वेदी (वय 43) हे यशोदा सिडस कंपनीत चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आरोपी बंटी जयराज याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. या पैशांच्या परतफेडीवरून सतत वाद होत होता.
दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री आरोपी रुपेश मंडलवार व अमजद पठाण यांनी मनोज वेदी यांना घरून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दाभा गावाजवळील नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हिंगणघाट डीबी पथकाने केवळ 12 तासांत तपासाची दिशा निश्चित करून आरोपींना अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून ताब्यात घेतले.
ही कार्यवाही मा.पोलिस अधिक्षक अनुराम जैन, मा.अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल नायक, पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांच्या आदेशाने स.पो.नि. पद्माकर मुंडे, पो.उप.नि. प्रंशात ठोंबरे (डीबी पथक प्रमुख), पो.राजेश शेंडे, पो.अमलदार आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी केली.
या घटनेत तिघा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, डीबी पथकाच्या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.