वर्धेत एका नामवंत वर्तमानपत्राचा ‘ब्लॅकमेलिंग’ बाजार? जाहिरातीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना धमक्या  छत्रपती सेनेचा इशारा

वर्धेत एका नामवंत वर्तमानपत्राचा ‘ब्लॅकमेलिंग’ बाजार?
जाहिरातीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना धमक्या  छत्रपती सेनेचा इशारा

वर्धा (प्रतिनिधी) :
वर्धा शहरात एका नामवंत वर्तमानपत्राच्या काही पत्रकारांकडून दिवाळी जाहिराती मागणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत अनेक अधिकाऱ्यांनीही आपली व्यथा व्यक्त केली.या प्रकाराविरोधात छत्रपती सेनेच्या वतीने कठोर भूमिका घेण्यात आली आहे. “जो कुणी जाहिरातीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करेल, त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी. अशा पत्रकारांना धडा शिकवणे आवश्यक आहे,” असे मत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.काही नागरिकांनीही यावर रोष व्यक्त करताना म्हटले की, “ज्यांचा इतिहास विक्रेत्यांच्या संपामुळे रिक्षांवर भोंगे लावून पेपर विक्री करण्याचा आहे, त्याच वर्तमानपत्राचे पत्रकार आज मोठेपणाचा आव आणतात. स्वतःला मोठ्या वर्तमानपत्राचे समजून जाहिरातीसाठी अधिकाऱ्यांच्या दारात सकाळपासून भटकतात. ही लाजिरवाणी बाब आहे.”विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकार जिल्ह्यातील इतर प्रामाणिक वृत्तपत्रांना बदनाम करून जाहिराती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. “इतर वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यास त्याचे स्कुलेशन आमच्या इतके नाही” असे सांगून जाहिरातदारांना दिशाभूल केली जाते, असेही आरोप होत आहेत.या पार्श्वभूमीवर छत्रपती सेनेने ग्रामीण पत्रकार संघ व इतर स्थानिक माध्यमांना आवाहन केले आहे की, “प्रामाणिक वर्तमानपत्रांना ग्रामीण भागात बळ द्या. जबरदस्तीने जाहिरात मागणाऱ्यांना न घाबरता नकार द्या. अशा ब्लॅकमेलिंगविरोधात एकजूट करून उभे राहणे गरजेचे आहे.”


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles