
आर्वी येथील.श्री ज्ञानेश्वरराव रामकृष्णजी पडोळे यांचे दुःखद निधन.
निधन वार्ता.
आर्वी येथील.श्री ज्ञानेश्वरराव रामकृष्णजी पडोळे यांचे दुःखद निधन.
आर्वीकरांना दुःखद संदेश श्री ज्ञानेश्वरराव रामकृष्णजी पडोळे राहणार अंतरडोह हल्ली मुक्काम जादुवाडी आर्वी यांना आज दिनांक 18/ 8/ 2025 रोजी सात वाजून पंधरा मिनिटांनी देवाज्ञा झाली. आर्वी येथील स्वर्गीय डॉक्टर शरदचंद्र काळे यांचे ते सहकारी तसेच खासदार अमर काळे यांचे ते सूचक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. आर्वी तालुक्यात अत्यंत नावलौकिक असे श्री ज्ञानेश्वररावजी पडोळे यांची ओळख होती. यांचा वृद्धपकाळाने आज मृत्यू झाला आहे दिनांक 19/ 8 /2025 ला मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे राहते घरून
जादुवाडी आर्वी येथून अंतयात्रा निघणार आहे. यांच्या मृत्यूने आर्वी विधानसभा मतदारसंघात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.