शोभाई कौशल्य प्रशिक्षण केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य कार्यक्रम

शोभाई कौशल्य प्रशिक्षण केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य कार्यक्र

वर्धा – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शोभाई कौशल्य प्रशिक्षण केंद्रात विविध उपक्रमांनी उत्सवमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्राच्या व्यवस्थापिका सौ. अपेक्षा सुरज जयस्वाल व सुरज जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर व्यवस्थापिका व मार्गदर्शकांनी विद्यार्थिनींना बिनामूल्य कौशल्य प्रशिक्षणाची संधी व त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषत: आर्थिकदृष्ट्या निर्बल घटकातील मुली व महिलांना आत्मनिर्भर व सशक्त करण्यासाठी या प्रशिक्षणाचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर त्यांनी प्रेरणादायी भाषण केले.

यानंतर विद्यार्थिनींच्या सहभागाने रॅली काढण्यात आली. देशभक्तीच्या घोषणा देत, समाजात शिक्षण व स्वावलंबनाचा संदेश पोहोचविण्यात आला. रॅलीनंतर केंद्रात सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला.

उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक जागरूकतेचा संगम झालेल्या या कार्यक्रमानंतर समारोप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थिनी व शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles