
डिझेल माफियांवर सेवाग्राम पोलिसांची मध्यरात्री धाड!
डिझेल माफियांवर सेवाग्राम पोलिसांची मध्यरात्री धाड !
दोन जणांना अटक; एक टँकर आणि १२ कॅन डिझेल जप्त
वर्धा (प्रतिनिधी): दोन दिवसांपूर्वी सेवाग्राम पोलिसांनी डिझेल माफियांवर मध्यरात्री कारवाई करत मोठी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एक टँकर आणि तब्बल १२ मोठे डिझेलचे कॅन जप्त केले असून, चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली लाखो रुपयांची ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणाची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नसली तरी, ही धाड पवनार गावाजवळील एका पेट्रोल पंपालगतच्या हॉटेल परिसरात टाकण्यात आल्याचे समजते. त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अवैध डिझेल-पेट्रोल विक्रीचा धंदा सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती. हा प्रकार अनेकांच्या डोळ्यादेखत चालू असून, या मागे कुणाचा तरी आशीर्वाद असल्याची कुजबुजही जनतेत आहे.याचप्रमाणे, केळझर येथील एका हॉटेलात देखील अशाच प्रकारे अवैध डिझेल-पेट्रोल व्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून स्थानिक व प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत होत्या. अखेर एका हिंदी दैनिकाने याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस यंत्रणा हालचालीस आली आणि कारवाई झाली.सध्या पोलिसांनी सेलू येत चौघाना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. मात्र या कारवाईविषयी अधिकृत निवेदन देण्यात आले नसल्याने संपूर्ण घटनेभोवती गुप्ततेचे सावट आहे.