भेसळ पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब , गिरीश राजपाल यांच्या पंपावर संताप!

भेसळ पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब . गिरीश राजपाल यांच्या पंपावर संताप!

भेसळ पेट्रोलचा धंदा कधी थांबणार?” असा नागरिकांचा सवाल

वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील)
दिवाळीच्या तोंडावरच शहरातील नागरिकांना भेसळ पेट्रोलचा फटका बसत आहे. “आमच्या नवीन दुचाकीचे इंजिन खराब झाले!” अशा तक्रारींनी नागरिक त्रस्त झाले असून, वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील गिरीश राजपाल यांच्या पेट्रोल पंपावरून विकल्या जाणाऱ्या भेसळ पेट्रोलचा प्रकार तत्काळ बंद करावा, अशी मागणी होत आहे.शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीचा धंदा सुरू असल्याचे वारंवार वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि संबंधित अधिकारी यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मागील काळात या परिसरात पोलिसांचा पेट्रोल पंप सुरू होण्याची योजना होती. परंतु, त्या पंपामुळे आपला “डोंगा बुडेल” या भीतीने गिरीश राजपाल यांनी अडथळे निर्माण केले, अशी स्थानिकांत चर्चा आहे. परिणामी पोलिसांचा पंप सुरूच होऊ शकला नाही, आणि भेसळ पेट्रोलचा व्यवसाय आजही बेधडक सुरू आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेवाग्राम व सावंगी परिसरात राजपाल यांच्या मालकीची हॉटेल्स असून, या ठिकाणांचा वापर अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीसाठी केला जातो, असा आरोप आहे.दरम्यान, नागरिक रवींद्र कुमार चाफले व देवेन्द्रजी हिवरकर यांनी सांगितले की,

“या पंपातून घेतलेल्या पेट्रोलमध्ये अतिरिक्त इथेनॉल मिसळल्याने आमच्या वाहनांचे इंजिन पूर्णपणे खराब झाले. संबंधितांनी तत्काळ तपासणी करावी.”

नागरिकांनी याबाबत आयुक्त, नागपूर यांच्याकडे पंपाची डेन्सिटी तपासणी आणि नमुना चाचणी करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, जनतेला देखील या पंपावरून पेट्रोल घेताना सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles